UPSC Exam 2024: 'UPSC'ची परीक्षा पुढे ढकलली, पाहा नवीन तारखा...

UPSC Exam 2024: 'UPSC'ची परीक्षा पुढे ढकलली, पाहा नवीन तारखा...

लोकसभा निवडणुकीमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाने UPSCची परीक्षा पुढे ढकलली आहे.
Published by :
Sakshi Patil

लोकसभा निवडणुकीमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाने UPSC CSE 2024 प्रिलिम्स परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा पूर्वी 26 मे रोजी होणार होती. मात्र, आता ही परीक्षा 16 जून रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी उमेदवारांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या काही दिवस आधी ऑनलाइन जारी केले जाणार आहेत.

लोकसभा निवडणुकीमुळे आयोगाने परीक्षा पुढे ढकलली आहे. वास्तविक, लोकसभा निवडणुकीची तारीख आणि UPSC CSE 2024 प्रिलिम्स परीक्षेची तारीख सारखीच आली होती. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाने अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे.

परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आयोगाने नवीन तारीखही जाहीर केली आहे. UPSC CSE 2024 प्रिलिम्स परीक्षा आता 16 जून 2024 रोजी घेतली जाईल. तर UPSC CSE 2024 ची मुख्य परीक्षा 20 सप्टेंबर रोजी घेतली जाईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com