UPSC Results 2025 : UPSC अंतर्गत IES आणि ISSचा निकाल जाहीर! मोहित अग्रवाल देशात पहिला

UPSC Results 2025 : UPSC अंतर्गत IES आणि ISSचा निकाल जाहीर! मोहित अग्रवाल देशात पहिला

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) आयईएस (Indian Economic Service) आणि आयएसएस (Indian Statistical Service) या 2025 च्या परीक्षांचा निकाल जाहीर केला आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) आयईएस (Indian Economic Service) आणि आयएसएस (Indian Statistical Service) या 2025 च्या परीक्षांचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवारांना आपला निकाल अधिकृत संकेतस्थळावर upsc.gov.in पाहता येणार आहे.

जानेवारी 2025 मध्ये या पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये मुलाखत व व्यक्तिमत्व चाचणी घेण्यात आली. अखेर या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, भारतीय आर्थिक सेवेसाठी (IES) 12 आणि भारतीय सांख्यिकी सेवेसाठी (ISS) 35 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

आयईएसच्या निकालात मोहित अग्रवाल नदबईवाला देशात प्रथम आला आहे. ऊर्जा रहेजा हिने दुसरे स्थान पटकावले असून गौतम मिश्रा तिसऱ्या स्थानी आहे. दरम्यान, आयएसएसच्या निकालात कशिस कसाना हिने अव्वल स्थान मिळवले आहे. तिच्यानंतर आकाश शर्मा दुसऱ्या स्थानावर आणि शुभेंदू घोष तिसऱ्या स्थानावर आहेत.

UPSC च्या निकालानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड आता मूळ कागदपत्रांच्या पडताळणीनंतर अंतिम करण्यात येईल. त्यानंतर त्यांची नियुक्ती केली जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. युपीएससीच्या या निकालामुळे यंदा हजारो उमेदवारांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत असून, देशातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना सरकारी सेवेत काम करण्याची संधी मिळणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com