Urfi Javed, Chitra Wagh
Urfi Javed, Chitra WaghTeam Lokshahi

‘संजय आठवतोय का?’; उर्फी जावेदने ट्विटरवर पोस्ट शेअर करत विचारला चित्रा वाघ यांना सवाल

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेदमध्ये मागील काही दिवसांपासून ट्विटर वॉर चांगलेच रंगले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेदमध्ये मागील काही दिवसांपासून ट्विटर वॉर चांगलेच रंगले आहे.चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदविरोधात थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर ही बाई मला ज्यादिवशी सापडेल, त्या दिवशी थोबाडच रंगवेन, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी उर्फीला इशारा दिला होता. यावर उर्फीने आता प्रत्युत्तर दिले असून चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचले आहे.

उर्फीने तिच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रा वाघ यांच्यासाठी पोस्ट लिहिली आहे. यावेळी तिने आता शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांचा उल्लेख केला आहे. ती म्हणाली की, ‘ही तीच महिला आहे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना संजय राठोडच्या अटकेसाठी ओरडत होत्या. त्यानंतर लाच घेतल्यामुळे त्यांचा पती निशाण्यावर आला. पतीला वाचवण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर संजय आणि चित्राजी एकमेकांचे चांगले मित्र बनले. मीसुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर आम्ही दोघीसुद्धा चांगल्या मैत्रिणी होऊ’ असे म्हणाली.

यासोबतच ‘चित्रा वाघ यांची खास मैत्रीण बनण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. चित्राजी तुम्हाला संजय आठवतोय का? तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तुमच्या दोघांची चांगली मैत्री झाली. त्यांच्या ज्या चुकांविरोधात तुम्ही राष्ट्रवादीमध्ये असताना हल्लाबोल केला होता, त्या सर्व तुम्ही आता विसरला आहात’,असे म्हणत उर्फीने चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केलाय.

Admin
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com