F-16 crash California
F-16 crash California

US News: कॅलिफोर्नियामध्ये F-16 लढाऊ विमान कोसळले! पायलटने शेवटच्या क्षणी उडी मारून वाचवले प्राण, VIDEO VIRAL

F-16 crash in California: कॅलिफोर्नियात प्रशिक्षणादरम्यान एफ-16 लढाऊ विमान कोसळले. पायलटने क्षणार्धात पॅराशूट उघडून सुरक्षितपणे उडी मारत जीव वाचवला.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

बुधवारी कॅलिफोर्नियामध्ये एक F-16 लढाऊ विमान कोसळले आणि अमेरिकन हवाई दलाच्या एलिट थंडरबर्ड्स स्क्वॉड्रनचा एक विमान ट्रोना विमानतळाजवळ दुर्घटनेत कोसळल्याची घटना घडली. अपघातानंतर वैमानिकांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही आणि ते सुरक्षितपणे विमानातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. तरीही, दुर्घटनेचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

हा अपघात डेथ व्हॅलीच्या दक्षिणेकडील एका दुर्गम वाळवंट भागात स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:४५ वाजता घडला. या अपघाताचे अनेक व्हिडिओ समोर आले असून त्यात विमान जमिनीवर धडकताना दिसते. या वेळेस पायलटने पॅराशूट वापरून सुरक्षितपणे आपला बचाव केला. धडक बसल्यानंतर विमानात स्फोट झाला आणि आकाशात धुराचे मोठे लोट पसरले. या दुर्घटनेचा तपास अद्याप चालू आहे.

F-16 crash California
IndiGo Flights: प्रवाशांचे हाल! इंडिगोची अडचणी सुरुच, ८ विमानतळांवर 100 पेक्षा अधिक फ्लाइट्स रद्द

थंडरबर्ड्सने अपघाताची पुष्टी करणारे निवेदन जारी केले असून, त्यांनी म्हटले आहे की "३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०:४५ वाजता कॅलिफोर्नियातील नियंत्रित हवाई क्षेत्रात प्रशिक्षण मोहिमेदरम्यान थंडरबर्डचा पायलट एफ-१६सी फायटिंग फाल्कन विमानातून सुरक्षित बाहेर पडला." पायलटला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. सॅन बर्नार्डिनो काउंटी अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली आणि विमानात पायलट एकमेव प्रवासी असल्याची माहिती मिळाली.

F-16 crash California
Mission 2026: बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लॅन तयार

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सहा थंडरबर्ड्स जेट्सनी आदल्या दिवशी प्रशिक्षण उड्डाण केले होते, पण फक्त पाचच विमान परतले. सुरुवातीच्या तपासानुसार विमान नेव्हल एअर वेपन्स स्टेशन चायना लेकजवळ अज्ञात कारणांमुळे कोसळले. अपघातस्थळ हे लष्करी प्रशिक्षणासाठी वारंवार वापरल्या जाणाऱ्या भागात आहे. थंडरबर्ड्स सामान्यतः नियोजित एअर शोच्या आधी अशा प्रशिक्षण उड्डाणांसाठी प्रसिद्ध आहेत.

एफ-१६ फायटिंग फाल्कन हे थंडरबर्ड्सच्या एरोबॅटिक प्रदर्शनातील प्रमुख विमान आहे आणि हे विमान अमेरिकन हवाई शक्तीचा गौरव करणे तसेच भरती प्रयत्नांना चालना देणे या उद्देशाने वापरले जाते. अमेरिकी हवाई दलाच्या सार्वजनिक व्यवहार कार्यालयाने सांगितले की, या अपघाताचा तपास सुरू आहे आणि क्रॅश साईटची चौकशी आणि प्रारंभिक आढावा पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती जाहीर केली जाईल. दुर्घटनेचे कारण अद्याप निश्चित झालेले नाही.

Summary
  • कॅलिफोर्नियात थंडरबर्ड्स स्क्वॉड्रनचे एफ-16 विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळले.

  • पायलटने शेवटच्या क्षणी पॅराशूटद्वारे उडी मारून जीव वाचवला.

  • अपघातानंतर विमानात मोठा स्फोट झाला; धुराचे लोट पसरले.

  • दुर्घटनेचे कारण अजून अस्पष्ट असून हवाई दलाने तपास सुरू केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com