Big Breaking : भारताने केली ट्रम्प यांची बोलती बंद; अमेरिकेची झोप उडवली
थोडक्यात
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली
भारताने मोठं पाऊल उचलत अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे.
आता भारतीय निर्यातदारांनी अमेरिकन बाजारपेठेऐवजी चीनकडे आपला माल वळवला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. यानंतर भारताने मोठं पाऊल उचलत अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे. ट्रम्प यांच्या आरोपानुसार, भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतो, आणि त्याचा उपयोग रशियाच्या युद्ध फंडासाठी होतो. यामुळे अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावला आहे.
अमेरिकेच्या या टॅरिफमुळे भारतीय निर्यातदारांची चिंता वाढली होती, पण आता भारतीय निर्यातदारांनी अमेरिकन बाजारपेठेऐवजी चीनकडे आपला माल वळवला आहे. चीनचे राजदूत शू फीहोंग यांनी म्हटले की, चीन भारतीय वस्तूंचं स्वागत करतो आणि भारताच्या मदतीसाठी तयार आहे.
याचा परिणाम म्हणजे, 2025-26 च्या पहिल्या सहा महिन्यात भारताची चीनसोबतची निर्यात 22 टक्क्यांनी वाढली आहे. 2025 च्या एप्रिल ते सप्टेंबरच्या कालावधीत भारताने चीनला 8.41 अब्ज डॉलरचे सामान निर्यात केले, जे गेल्या वर्षीच्या 6.90 अब्ज डॉलरच्या तुलनेत 22 टक्के जास्त आहे.
अमेरिकेने ऑगस्टमध्ये टॅरिफ लागू केल्यानंतर, भारताची निर्यात चीनकडे 34 टक्क्यांनी वाढली आहे. भारत आता चीनला मुख्यत: तेल, पेट्रोलियम उत्पादने, टेलीफोन सेट आणि विविध पार्ट्स निर्यात करत आहे, ज्यात पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीमध्ये 116 टक्क्यांची वाढ झाली आहे.

