Donal Trump Doha : भारतात iphone चं उत्पादन करू नका, डोनाल्ड ट्रम्प यांचा Apple च्या सीईओंना थेट इशारा?

Donal Trump Doha : भारतात iphone चं उत्पादन करू नका, डोनाल्ड ट्रम्प यांचा Apple च्या सीईओंना थेट इशारा?

भारताने अमेरिकन वस्तूंवर शून्य कर आकारण्याची ऑफर दिली आहे.
Published by :
Shamal Sawant
Published on

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोहा येथे एक मोठे विधान केले आहे, ज्यामध्ये त्यांनी अॅपल कंपनीला भारतात आयफोन बनवण्यास मनाई केली आहे. ट्रम्प यांनी अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांना सांगितले की, भारताला स्वतःचे हितसंबंध सांभाळू द्या. भारताने अमेरिकन वस्तूंवर शून्य कर आकारण्याची ऑफर दिली आहे.

ट्रम्प म्हणाले, "मी काल टिम कुकशी बोललो. तुम्ही 500 अब्ज डॉलर्सची कंपनी उभारत आहात, पण आता मी ऐकले आहे की तुम्ही भारतात काम सुरु करणार आहात. पण भारतात बांधकाम करावे असे वाटत नाही. जर तुम्हाला भारताला मदत करायची असेल तर ठीक आहे, पण भारत हा जगातील सर्वात जास्त शुल्क असलेल्या देशांपैकी एक आहे. तिथे विक्री करणे कठीण आहे. भारताने आम्हाला एक करार दिला आहे ज्यामध्ये त्यांनी आमच्या वस्तूंवर कोणतेही शुल्क न लावण्याचे आश्वासन दिले आहे".

ट्रम्प पुढे म्हणाले, " आता आम्हाला तुम्ही भारतात बांधकाम करावे असे वाटत नाही. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो. ते खूप चांगले काम करत आहेत. आम्हाला तुम्ही अमेरिकेत काम करावे अशी आमची इच्छा आहे." ट्रम्प यांच्या मते, अॅपल आता अमेरिकेत 500 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीसह उत्पादन वाढवेल.

भारतात, अॅपल आधीच फॉक्सकॉन आणि टाटा यांच्या सहकार्याने आयफोनचे उत्पादन करत आहे. २2025 मध्ये भारतात बनवले जाणारे 15% आयफोन अमेरिकेत पाठवले जातील. ट्रम्प यांचे हे विधान भारताच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमासाठी आव्हान ठरू शकते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com