USA Student Visa: अमेरिकेत शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना धक्का, व्हिसा मुलाखती बंद
अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विद्यार्थ्यांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परदेशातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्हिसा मुलाखतींवर बंदी घालण्यात आली आहे. त्यासंदर्भातील अधिकृत घोषणा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. त्यामुळे आधुनिक अभ्यासक्रम शिकण्यासाठी वेगवेगळ्या देशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेची दारे सध्या बंद करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे सोशल मीडिया अकाऊंट आधी तपासले जाणार आहेत. अमेरिकेची सुरक्षा आणि सामाजिक हितांचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अमेरिकन सरकारकडून सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेचे कारण देत हा निर्णय घेतला गेला आहे.
या निर्णयामुळे अमेरिकेत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आधीच व्हिसा प्रक्रियेसाठी खूप वाट पाहावी लागते आता सोशल मीडिया अकाउंट चेकिंगमुळे ही प्रक्रिया अधिक लांबण्याची शक्यता आहे. त्याउलट अमेरिकेमध्ये दरवर्षी लाखो विद्यार्थी परदेशातून शिक्षणासाठी येत असतात. अमेरिकेतील विद्यापीठांचे आर्थिक उत्पन्न बहुतांशी या परदेशी विद्यार्थ्यांवर अवलंबून असते. त्यामुळेअमेरिकेतील विद्यापीठांना या सरकारच्या निर्णयामुळे आर्थिक संकटांना सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे.