शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर उत्तम जानकर म्हणाले...

शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर उत्तम जानकर म्हणाले...

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता माळशिरसमधील उत्तम जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर उत्तम जानकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

उत्तम जानकर म्हणाले की, माढा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार यांची बैठक झाली. 40 - 50 वर्ष आमचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात लढलेले आहेत. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांची काय भावना आहे. आपण एकत्र यायचं की नाही या सगळ्या प्रक्रिया 19 तारखेच्या बैठकीत ठरतील. कार्यकर्ते ज्यापद्धतीने निर्णय घेतील त्यापद्धतीने त्यांच्यासोबत राहावं लागणार. शरद पवारांसोबत राहावं ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

यासोबतच ते म्हणाले की, मी प्रवेश कुठेच करणार नाही. मी अजितदादा गटामध्ये आहे. माझा प्रवेश नाही. मी आहे तिथेच आहे. जरी मी अजितदादा गटात असलो तरी त्यांच्यासुचनेप्रमाणे होतो. फडणवीससाहेबांनी सांगितल्यामुळे मी अजितदादांच्या गटामध्ये होतो. जी भूमिका कार्यकर्त्यांची असेल ती घेतली जाईल. असे उत्तम जानकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com