Uttarakhand Car Accident
Uttarakhand Car Accident Team Lokshahi

VIDEO : उत्तराखंडमध्ये पर्यटकांची कार नदीत बुडाली; पंजाबमध्ये 9 जणांचा मृत्यू

Uttarakhand Car Accident : या घटनेमुळे वाहन चालकांमध्ये सध्या घबराट निर्माण झाली आहे.
Published by :
Sudhir Kakde

Uttarakhand Car Accident : देशात सध्या सगळीकडेच पावसानं थैमान घातलं असून, त्यामुळे अनेक दुर्घटना देखील घडत असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच उत्तराखंडमध्ये एक मोठी घटना घडल्याचं समोर आलं आहे. नदीमध्ये कार वाहून गेल्यानं तब्बल ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पंजाबमधील नऊ पर्यटक उत्तराखंडच्या रामनगरमधून प्रवास करत असताना पहाटेच्या वेळी त्यांची कार ढेला नदीत कोसळली, त्यानंतर पाण्याच्या प्रवाहामुळे कार वाहून गेल्याने सर्वजण बुडाल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलं आहे. सर्व पर्यटक पटियाला येथे राहणारे असल्याची माहिती आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com