सुट्टी संपली! विदर्भातील शाळांमध्ये आजपासून किलबिलाट सुरू

विदर्भातील शाळांमध्ये आजपासून किलबिलाट सुरू
Published by  :
Team Lokshahi

विदर्भातील शाळांमध्ये आज पासुन किलबिलाट सुरू झाला आहे. अमरावती जिल्ह्यात दीड हजारावर शाळांत विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. दोन महिन्याच्या उन्हाळी सुट्टी नंतर नवीन शैक्षणिक सत्र आज पासून सुरू झाले. आज पासून अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातील शाळांची घंटा वाजली.

जिल्ह्यातील १हजार ५८० जिल्हा परिषदसह १ हजार ५६ खासगी शाळामध्ये मोठ्या उत्साहात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्पगुच्छ देऊन शिक्षकांनी जोरदार स्वागत करण्यात आले. तिवसा येथील श्री देवराव दादा हायस्कूल मध्ये अतिशय हास्यमय वातावरणात विद्यार्थी शाळेच्या पहिल्यांच हजर झाले होते तर अनेक शाळांत विद्यार्थ्यांना गणवेश वितरण झाले नाही त्यामुळे पहिल्याच दिवशी गणवेश देऊ हा उपक्रम मात्र शिक्षण विभागाचा फसला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com