ताज्या बातम्या
Vaibhav Naik On Narayan Rane : 'नारायण राणे पुत्रप्रेमासाठी आंधळे झालेत', माजी आमदार वैभव नाईक यांची नारायण राणेंवर टीका
पक्षापेक्षा त्यांना पुत्र महत्त्वाचे वाटतात, असं विधान करत माजी आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांच्यावर आरोप केले आहेत.
नारायण राणे पुत्रप्रेमासाठी आंधळे झाले आहेत. पक्षापेक्षा त्यांना पुत्र महत्त्वाचे वाटतात, असं विधान करत माजी आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांच्यावर आरोप केले आहेत.
नारायण राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षात ते कार्यकर्त्यांचा हिरमोड करतात. एका बाजूला प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण स्वबळाची भाषा करत असताना राणेंना मात्र पुत्र प्रेमासाठी युती हवी आहे. ते आपल्या दोन्ही मुलांचा बॅलन्स साधण्यासाठी युती करू पाहत आहेत. असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
भाजपने या संपूर्ण प्रक्रियेपासून नारायण राणे यांना बाजूला ठेवला आहे. पुढच्या काळात राणेंवर पक्ष विरोधी काम करत असल्याने कारवाई करावी. असा सल्ला सुद्धा वैभव नाईक यांनी भाजपला दिला आहे..
