ताज्या बातम्या
Vaibhavi Deshmukh; 'कठोर शिक्षा झाली पाहिजे...' संतोष देशमुख यांच्या मुलीची पहिली प्रतिक्रिया
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. संतोष देशमुख यांच्या मुलीची पहिली प्रतिक्रिया जाणून घ्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड याचा दाखल आरोपपत्रात आरोपी क्रमांक एक म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. तर आवादा कंपनीच्या खंडणीप्रकरणातूनच हत्या झाल्याचही या आरोपपत्रात उल्लेख करण्यात आलं आहे. यावरच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हीने लोकशाही मराठीला पहिली प्रतिक्रिया दिली आहे.