ताज्या बातम्या
Pune Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणेचा शवविच्छेदन अहवाल समोर; अहवालात नेमकं काय लिहिलं...?
वैष्णवी हगवणे शवविच्छेदन अहवाल: गळफास व धारदार वाराच्या जखमा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुळशी तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. हुंड्याच्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलले अशी प्राथमिक पोलीस तपासादरम्यान समोर आली आहे. हुंड्याच्या मागणीसाठी वैष्णवीचे सासरच्या लोकांनी तिच्या प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ केला असा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केला आहे. आता मोठी अपडेट समोर येते आहे. वैष्णवीचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवला होता. त्याचा अहवाल समोर आला आहे.
बी जे हॉस्पिटलने दिलेला शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळ्याला फास लावून झाला आहे. तिच्या मृतदेहावर धारदार वस्तूने वार केल्याने भरपूर जखमा आढळून आल्या आहेत.