Beed Santosh Deshmukh Case
Beed Santosh Deshmukh CaseBeed Santosh Deshmukh Case

Beed Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड यांचा जामीन अर्ज फेटाळला; काय घडलं न्यायालयात जाणून घ्या एका क्लिकवर

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी त्याने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर वाल्मिकच्या वकिलांनी त्याच्या वतीने युक्तिवाद केला.
Published by :
Riddhi Vanne
Published on

(Beed Santosh Deshmukh Case) बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने खारिज केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या अर्जावर सुनावणी सुरू होती.

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी त्याने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर वाल्मिकच्या वकिलांनी त्याच्या वतीने युक्तिवाद केला. वकिलांनी सांगितले की, मोक्का कायदा (MPDA) त्याच्यावर चुकीच्या पद्धतीने लावला गेला आहे. तसेच, देशमुख यांच्या हत्येत कराडचा काही संबंध नाही, कारण त्याच्या म्हणण्यानुसार तो घटनेच्या दिवशी शेकडो किलोमीटर दूर होता. त्याला या प्रकरणात अडकवण्यात आले आहे, असे वकिलांनी सांगितले.

या युक्तिवादावर सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडली. सरकारी वकील ऍड. अमरजितसिंह गिरासे यांनी घटनाचा सखोल तपशील सादर केला. यामध्ये साक्षीदारांचे तपशील, मोबाईल फोन संवादाचा अहवाल (सीडीआर), सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फुटेज, ध्वनिफीत मुद्रण आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल यांचा समावेश होता. या सर्व पुराव्यांचा विचार करून न्यायालयाने जामिनाचा अर्ज फेटाळला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com