Varsha Gaikwad : जनता जाणतेय यावेळेला महाविकास आघाडीला निवडून द्यायचं आहे

Varsha Gaikwad : जनता जाणतेय यावेळेला महाविकास आघाडीला निवडून द्यायचं आहे

उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी आज त्यांच्या मतदारसंघातील सांताक्रुज येथे त्यांनी प्रचार कार्यालयाचा उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Published by :
Siddhi Naringrekar

उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी आज त्यांच्या मतदारसंघातील सांताक्रुज येथे त्यांनी प्रचार कार्यालयाचा उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी माध्यमाशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, लोक समजत आहे यावेळेचे जे इलेक्शन आहे हे देशाच्या संविधानासाठी आहे. म्हणूनच आम्ही संविधान रक्षक म्हणून या काळामध्ये आता आम्ही जाणार आहोत. ही लढाई संविधानाच्या रक्षणासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे. महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करण्याचा प्रयत्न झाला. आज जे प्रेम दाखवत आहे ते पुतणा मावशीचे प्रेम आहे असे माझं म्हणणं आहे.

यासोबतच त्या म्हणाल्या की, ज्या पक्षाला तुम्ही तोडलं. ज्या पक्षाचे चिन्ह तुम्ही घेतलेत. दुसरं सरकार निर्माण केलं. त्यांच्या लोकांवर ईडीच्या कारवाई केल्या. नंतर काही लोकांना पक्षात घेतलं. मला मोदीजींना सांगायचे आहे की, तुम्ही विसरलात तुम्ही ज्या तऱ्हेने त्यांच्याशी वागलात महाराष्ट्राची जनता हे विसरलेली नाही. पक्ष तोडण्यासाठी तुम्ही सगळ्या बळांचा वापर केला. पैशांची आमिष दिली. सत्तेचा गैरवापर केला. जनता जाणतेय यावेळेला महाविकास आघाडीला निवडून द्यायचं आहे. जो प्रतिसाद जनसामान्यांचा मिळतो आहे. आमची लढाई संविधानासाठी आहे. असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com