वरुण गांधी भाजपाला सोडणार, धरणार काँग्रेसची वाट?

वरुण गांधी भाजपाला सोडणार, धरणार काँग्रेसची वाट?

उत्तर प्रदेशातील पीलीभीत येथील भाजप खासदार वरुण गांधी यांना भाजपा उमेदवारी देईल की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

उत्तर प्रदेशातील पीलीभीत येथील भाजप खासदार वरुण गांधी यांना भाजपा उमेदवारी देईल की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यातच आता वरुण गांधी भाजपात नाराज असल्याची माहिती मिळत आहे. वरुण गांधी आणि त्यांची चुलत बहीण प्रियंका गांधी यांच्यादरम्यान नेहमी बोलणं होत असतं. यात कौटुंबिक मुद्द्यांचा समावेश असतोच. पण हल्ली राजकारणावरही ते एकमेकांशी बोलत असतात.

वरुण गांधींनी भाजपाला सोडचिट्ठी दिली तर भाजपातून बाहेर पडले तरी वरुण गांधी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वरुण गांधींच्या नाराजीवरुन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी त्यांना पत्र लिहिले होते. वरुण गांधी हे काँग्रेसचे दिवंगत नेते संजय गांधी आणि त्यांच्या भाजपमधील पत्नी मनेका गांधी यांचे चिरंजीव आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com