Vasant More And Nilesh Lanke
Vasant More And Nilesh Lanke

एकाचवेळी होणार डबल धमाका? वसंत मोरे, निलेश लंके शरद पवार गटाच्या कार्यालयात पोहोचले

राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच मनसेला रामराम करणारे वसंत मोरे आणि अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके शरद पवार गटाच्या कार्यालयात पोहोचले आहेत.
Published by :

आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आपापल्या मतदारसंघात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच मनसेला रामराम करणारे वसंत मोरे आणि अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके एकाचवेळी शरद पवार गटाच्या कार्यालयात पोहोचले आहेत. यावेळी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि इतर पदाधिकारी या दोन्ही नेत्यांशी खलबते करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. आता हे दोन्ही बडे नेते शरद पवार गटाच्या गळाला लागणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

तत्पूर्वी, वसंत मोरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली, यावेळी ते म्हणाले, शरद पवारांनी मला भेटीसाठी बोलावलं आहे. पुण्याचं मैदान मारण्यासाठी कार्यालयात आलो आहे. पाच वर्षांपासून अमोल कोल्हे यांच्याशी मैत्राचे संबंध आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com