वर्ध्यात तीन युवकांकडून मध्यरात्री वाहनाची तोडफोड; हिंदनगर परिसरात दहशत

वर्ध्यात तीन युवकांकडून मध्यरात्री वाहनाची तोडफोड; हिंदनगर परिसरात दहशत

हिंदनगर परिसरात दहशत; रामनगर पोलिसांची मध्यरात्री पाहणी

भूपेश बारंगे, वर्धा

शहरातील हिंदनगर परिसरात मध्यरात्री च्या सुमारास तीन युवकांनी जवळपास दहा ते पंधरा वाहनाची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत हिंदनगर परिसरात राहणाऱ्या तीन युवकांनी रात्रीला घरासमोर रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेल्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे.या सर्व प्रकार सीसीटीव्ही कैद झाला असून त्यात तीन युवक दिसत आहे.त्यांच्या हातात टॉमी,लाठी दिसून येत आहे.या युवकांनी एका घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला फोडला असल्याचे प्रथमदर्शनी सांगत आहे.या परिसरात नागरिकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी हा प्रकार युवकांकडून केला गेला असल्याचे सांगण्यात येत आहे.

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनाच्या समोरील व मागील बाजूचे काचा फोडण्यात आल्या आहे. या प्रकरणी पोलिसांनी माहिती देण्यात आली असून रात्रीला रामनगर पोलिसांनी पाहणी केली असल्याचे सांगण्यात आले.अद्यापही या प्रकरणाची नोंद झाली नसली तरी या गावगुंड युवकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.ज्या युवकांनी हा प्रकार केला ते याच परीसरातील रहिवाशी असल्याची माहिती नागरिकांनी सांगितले आहे.मध्यरात्री फोडण्यात आलेल्या वाहनाच मोठं नुकसान झाले आहे.वाहन मालकांना आर्थिक फटका बसला आहे.यामध्ये खासगी वाहन 'भारत सरकार' अस लिहले असलेल्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे.

रामनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गुन्हेगारीत वाढ

रामनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दोन दिवसापूर्वी गळ्यातील चेन स्नॅचिंग घटना घडली.या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे नागरिक सांगत आहे.या परिसरात रात्रीला गावगुंड दहशत पसरवण्याचा प्रकार केला जात असतो. मध्यरात्री पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांवर आता प्रश्न निर्माण होत आहे.पेट्रोलिंग दरम्यान पोलीस जातात तरी कुठे असे प्रश्न येथील स्थानिक करत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com