वर्सोवा - वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव
वर्सोवा - वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव देण्यात आले आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय :
वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव
एमटीएचएल ला अटलबिहारी वाजपेयी स्मृती
शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव
राज्यात 700 ठिकाणी हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. 210 कोटीस मान्यता
पूर प्रतिबंधासाठी राज्यातील 1648 किमीच्या नद्यांमधील गाळ काढणार
मुंबई मेट्रो-3 मार्गासाठी धारावीचा भुखंड
भूखंडाच्या हस्तांतरणातील अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण
मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल,वरूड, फलटण येथे न्यायालये
संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ
भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित. 2 कोटी कार्ड्स वाटणार, आता 5 लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण.
आता असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ, करोडो कामगारांना लाभ मिळणार
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा विदर्भातील जिल्हयांचा समावेश (कृषि विभाग)
मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) येथे उभारणार. 100 कोटींच्या खर्चास मान्यता.