ताज्या बातम्या
Maharashtra Kesari : सोलापूरचा वेताळ शेळके ठरला महाराष्ट्र केसरी; पृथ्वीराज पाटीलचा केला पराभव
कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना सोलापूरचा वेताळ शेळके आणि मुंबईचा पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये झाला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या वेताळ शेळके याने मानाची महाराष्ट्र केसरी गदा पटकावली आहे. कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना सोलापूरचा वेताळ शेळके आणि मुंबईचा पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये झाला.
वेताळ शेळके यासह 66 व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला आहे. अंतिम सामन्यात सोलापूरच्या वेताळने मुंबईच्या पृथ्वीराज पाटील याचा पराभव करत महाराष्ट्र केसरी या गदेवर आपलं नाव कोरलं.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील महाअंतिम सामन्याचं आयोजन हे अहिल्यानगरमधील दादा पाटील महाविद्यालयाजवळील मैदानात करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाअंतिम सामना पार पडला.