मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याच्या फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले...

मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याच्या फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले...

देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली.
Published by :
Siddhi Naringrekar

देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. मला सरकारमधून मोकळं करावं ही नेतृत्त्वाला विनंती आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस कर्तुत्वान नेते आहेत. अडीच वर्षापूर्वी त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होत. पण भाजपने त्यांना उपमुख्यमंत्री केलं.

तसेच ते पुढे म्हणाले की, त्यानंतर महायुती सरकारने अडीच वर्ष जे काम केले त्यामुळे महाविकास आघाडीला लोकसभेत जास्त जागा मिळाल्या. त्यांनी आणि महायुतीने असाच परफॉर्मन्स पुढे सुरू ठेवावा म्हणजे विधानसभेत आम्हाला चांगले यश मिळेल. देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपदावर राहावे ही आमची आग्रही मागणी आहे. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com