पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोवर विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल; म्हणाले...

पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोवर विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल; म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल मुंबईत रोड शो झाला.
Published by :
Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल मुंबईत रोड शो झाला. या रोड शोच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणचं रस्ते, मेट्रो बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली होती. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशाचे पंतप्रधान ज्यावेळेस येतात. तेव्हा आम्ही समजू शकतो. प्रचारासाठी येत असताना अख्या दिवसभरामध्ये सकाळपासून टॅफिक वळवलं गेले. मुंबई ही कायम लाईव्ह असते. मुंबई ही कधीही न थांबणारी, मुंबई ही दिवस असेल किंवा रात्र असेल ही अविरत काम करणारी मुंबई आहे. अशावेळी तुम्ही सकाळी 6ला ट्रफिक वळवता आणि नंतर तुम्ही मेट्रो बंद करुन टाकता. त्यामुळे महिलांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते.

यासोबतच ते म्हणाले की, घरापर्यंत जाताना जो त्रास चारमान्यांना झाला, सर्वसामान्य नागरिकांना झाला. त्यांनी तर शापच दिला. तो शाप महायुतीला राज्यात संपवणारा शाप असेल. देशाचे पंतप्रधान आल्यानंतर तुम्ही रोड शो जर करत असाल तर इतरांचाही विचार करा. परंतु दुदैवाने मला असं वाटतं की, जेवढ्या सभा देशाच्या पंतप्रधानांच्या होतील तेवढात फायदा इंडिया आघाडीचा महाविकास आघाडीचा होईल. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com