Vijay Wadettiwar : सभागृहात एक- दोन गणवेशांच्या कपड्यांची क्वालिटी दाखवण्यापेक्षा सरकारने आधी स्वतःच्या कामाची क्वालिटी तपासावी

Vijay Wadettiwar : सभागृहात एक- दोन गणवेशांच्या कपड्यांची क्वालिटी दाखवण्यापेक्षा सरकारने आधी स्वतःच्या कामाची क्वालिटी तपासावी

विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, सभागृहात एक- दोन गणवेशांच्या कपड्यांची क्वालिटी दाखवण्यापेक्षा सरकारने आधी स्वतःच्या कामाची क्वालिटी तपासावी.

बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील अकोला ठाकरे येथील ही जिल्हा परिषदेची शाळा. पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग या शाळेत आहेत. २१ मे रोजी वादळाच्या तडाख्यात सापडून या शाळेच्या एका खोलीचे छप्पर उडाले. ४० दिवसांचा काळ लोटला तरी अजूनही दुरुस्ती झाली नाही. नवी खोलीही बांधण्यात आली नाही.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, १ जुलैला शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची अंगणवाडीत सोय करण्यात आली. आता शाळेचे छप्पर उडाल्याचे लेखी कळविल्याचे मुख्याध्यापक सांगतात. तरीही दुरुस्ती झाली नाही. सभागृहात एक- दोन गणवेशांच्या कपड्यांची क्वालिटी दाखवण्यापेक्षा सरकारने आधी स्वतःच्या कामाची क्वालिटी तपासावी. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com