Vikhroli : मुंबईत हृदयद्रावक घटना! विक्रोळीत लाऊडस्पीकरच्या अपघातात चिमुकलीचा मृत्यू

Vikhroli : मुंबईत हृदयद्रावक घटना! विक्रोळीत लाऊडस्पीकरच्या अपघातात चिमुकलीचा मृत्यू

Vikroli News: मुंबईतील विक्रोळी भागात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. खेळत असताना तीन वर्षांच्या चिमुकलीवर अचानक लाऊडस्पीकर कोसळला आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Vikroli News: मुंबईतील विक्रोळी भागात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. खेळत असताना तीन वर्षांच्या चिमुकलीवर अचानक लाऊडस्पीकर कोसळला आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला बसवलेला हा स्पीकर नीट सुरक्षित न केल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे.

घटनेच्या वेळी ती मुलगी धावत होती. त्याच क्षणी स्पीकरचा तोल गेला आणि तो थेट तिच्या अंगावर पडला. परिसरातील लोकांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या स्पीकर्समुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी कार्यक्रम आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

थोडक्यात

  1. मुंबईतील विक्रोळी भागात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली.

  2. खेळत असताना तीन वर्षांच्या चिमुकलीवर अचानक लाऊडस्पीकर कोसळला.

  3. या अपघातात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

  4. रस्त्याच्या कडेला बसवलेला लाऊडस्पीकर नीट सुरक्षित न केल्यामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.

  5. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com