Vinayak Raut : 'दुसऱ्या पक्षामध्ये जाताना कोणाच्यातरी डोक्यावर खापर फोडायची ही प्रत्येक पक्ष बदलूची सवय'

Vinayak Raut : 'दुसऱ्या पक्षामध्ये जाताना कोणाच्यातरी डोक्यावर खापर फोडायची ही प्रत्येक पक्ष बदलूची सवय'

कोकणातील राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ऊत म्हणाले.
Published on

कोकणातील राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाण्यातील आनंदाश्रम जवळ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली राजन साळवी यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झाला.

यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विनायक राऊत म्हणाले की, गद्दारी करुन दुसऱ्या पक्षामध्ये जात असताना कोणाच्यातरी डोक्यावर खापर फोडायची सवय ही प्रत्येक पक्ष बदलूची असते. तशीच ती त्यांनी केलेली आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याविरोधी उमेदवाराने त्यांच्यावर जे आरोप केलेलं आहेत. त्यांनी सांगितले आहे की, राजन साळवींकडे गद्दारीची 13 सर्टिफिकेट आहेत. जिथे तुम्ही गेलात तिथे तुम्ही सुखी कसे राहणार त्याची मला चिंता लागली आहे. असे विनायक राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com