विनायक राऊतांचा गद्दारी केलेल्या नेत्यांवर हल्लाबोल, म्हणाले, "त्यांना घाण खायचीच होती..."
शिवसेनेचे नेते राजन साळवी यांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी आज एक सभा घेतली आहे. यामध्ये त्यांनी ठाकरेंची साथ सोडलेल्या अनेक नेत्यांवर विनायक राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.
विनायक राऊतांनी सोडून गेलेल्या नेत्यांना गद्दार म्हणून संबोधले आहे. ते म्हणाले की, "गद्दारीला गाठणारी ताकद आपल्या शिवसेनेत आहे. राजापूरचा आमदार हा चाकरमान्यांच्या मेहनतीमधून तयार होतो. ज्यांना घाण खायचीच होती. ज्यांना बेमानी करायची करायची होती त्यांनी मलादेखील सोडलं नाही. उद्धव ठाकरे यांनी एकच निरोप दिला आहे की ज्या ताकतीने विश्वासाने तुम्ही राजापूरचा आमदार निवडून आणला आहे तो भविष्यात सुद्धा ठेवाल. गद्दारी किल्ल्याची खंत नाही. पण ज्या शिवसेनेने तुमच्या तोंडात घास भरवला. ज्या उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर सख्ख्या भावाप्रमाणे प्रेम केलं त्यांच्याशी तुम्ही गद्दारी केलीत"
पुढे ते म्हणाले की, "विनायक राऊतांमध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत माझा देह मातोश्रीच्या चरणीच जाणार. मातोश्रीची शाबासकी घेणं हे माझ्यासाठी खूप मोठा पुण्याचा काम आहे. ही माझ्या आई वडिलांची पुण्याई आहे. ही पुण्याई जतन केली नाही तर मला नरकात जागा मिळेल. येत्या आठवड्यात आपण ते मृग ला नवीन कार्यालय चालू करणार आहोत. राजापूर मधील पहिली सभा आपण संगमेश्वरला घेणार आहोत. येत्या महिन्याभरात आपण जाहीर मिळावे घेणार आहोत" असेही विनायक राऊत म्हणाले.