YS Jagan Mohan Reddy
YS Jagan Mohan Reddy Team Lokshahi

आंध्र प्रदेशची 'ही' असणार आता नवी राजधानी; मुख्यमंत्री रेड्डींनी केली घोषणा

अमरावती नाही तर विशाखापट्टनम ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी असेल
Published by :
Sagar Pradhan

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी मोठी मोठी घोषणा केली आहे. विशाखापट्टणम' ही आंध्र प्रदेशची नवीन राजधानी असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. आंध्र प्रदेशमध्ये जागतिक गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यासंबंधित आयोजित केलेल्या दिल्लीमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी ही घोषणा केली आहे. त्यामुळे आता यापुढे अमरावती नाही तर विशाखापट्टनम ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी असेल.

या कार्यक्रमात बोलत असताना ते म्हणाले की, आगामी काळात आंध्र प्रदेशची राजधानी बनणार असलेल्या विशाखापट्टणममध्ये मी तुम्हा सर्वांना आमंत्रित करण्यासाठी आलो आहे. येत्या काही महिन्यांत मी विशाखापट्टणम ही आमची राजधानी असेल. मी देखील लवकरच तिथे शिफ्ट होणार आहे. असे ते म्हणाले. या पूर्वीच मुख्यमंत्री रेड्डी यांनी विशाखापट्टणम हे राज्य प्रशासनाचे प्रमुख ठिकाण म्हणून प्रस्तावित केले होते. मुख्यालय म्हणून हेच राज्याच्या राज्यपालांचे ठिकाणही असेल. परंतु विधिमंडळाचे कामकाज अमरावतीतून चालणार आहे.

पूर्वाश्रमीच्या आंध्रप्रेदश राज्याचे विभाजन होऊन तेलंगणा या नव्या राज्याची निर्मिती झाल्यानंतर हैद्राबाद हे महत्त्वाचं शहर तेलंगणाला राजधानी म्हणून मिळाले. त्यानंतर आंध्रप्रदेश सरकारने आपली राजधानी अमरावती घोषित करून त्यांच्या नव्या बांधणीसाठी विशेष प्रयत्न केले. अमरावतीमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मोठी गुंतवणूक देखील करण्यात आली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com