Vishal Mega Mart
Vishal Mega Mart

विशाल मेगा मार्टची आयपीओ लिस्टिंग: गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

विशाल मेगा मार्ट शेअर्सची बुधवारी लिस्टिंग होत आहे. 8,000 कोटी रुपयांच्या सार्वजनिक इश्यूला 27 पट ओव्हरसबस्क्रिप्शन मिळालं.
Published by :
Team Lokshahi
Published on

देशभरात पसरलेली सुपर मार्केट जायंट विशाल मेगा मार्टची बुधवारी शेअर बाजारात लिस्टिंग होत आहे. विशाल मेगा मार्ट हे 99 रुपयांपासून सुरू होणारे कपडे आणि किराणा सामान यासारख्या कमी किमतीच्या ऑफर्ससाठी ओळखलं जातं. संपूर्ण देशात विशाल मेगा मार्टचे 645 स्टोअर्सचे जाळं पसरलं आहे.

विशाल मेगा मार्टचा ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) त्याच्या लिस्टिंगच्या एक दिवस आधी वाढला. सोमवारी सायंकाळी IPO वाटप अंतिम झाले. विशाल मेगा मार्ट या हायपरमार्केट चेनचे शेअर्स 18 डिसेंबर रोजी NSE आणि BSE वर सूचीबद्ध केले जातील. गुंतवणूकदारांच्या जोरदार मागणीमुळे सार्वजनिक इश्यूने 1.61 लाख कोटी रुपयांच्या बोली आकर्षित केल्या. अधिकृत रजिस्ट्रार KFin Technologies Ltd द्वारे शेअर वाटप अंतिम करण्यात आले.

शेअरच्या जीएमपीमध्ये २५ टक्क्यांची वाढ

लिस्टिंगला फक्त एक दिवस बाकी असताना, विशाल मेगा मार्ट शेअर्स ग्रे मार्केटमध्ये जोरदार उसळी पाहायला मिळाली. शेअरचा GMP 25 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. जो IPO भोवती मजबूत बाजारभाव दर्शवितो. ग्रे मार्केट प्रीमिअम हे स्टॉक सूचीबद्ध झाल्यावर कसे कार्य करू शकते याचे ते प्रकारे अनधिकृत सूचक म्हणून काम करते.

विशाल मेगा मार्टच्या 8,000 कोटी रुपयांच्या सार्वजनिक इश्यूला 27 पट ओव्हरसबस्क्रिप्शन मिळाले आहे. गुंतवणूकदारांनी 2,064 कोटी समभागांसाठी बोली लावली, तर 75.67 कोटी समभाग ऑफर केले आहेत.

देशामध्ये अंदाजे ५०,९४५ अब्ज रूपयांची किराणा आणि सुपरमार्केटची इंडस्ट्री

भारतामध्ये किराणा आणि सुपरमार्केटची इंडस्ट्री अंदाजे ५०,९४५ अब्ज रूपयांची म्हणजेच ६०० अब्ज डॉलर्सची आहे. ज्यामध्ये DMart आणि टाटा समूहाच्या स्टार बाजार हे विशाल मेगा मार्टचे स्पर्धक आहेत. वाढती महागाई आणि क्विक-कॉमर्स कंपन्यांच्या वाढीचं आव्हानांचा विशाल मेगा मार्टला सामना करावा लागणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com