Local Body Elections :  न्यायालयीन प्रकरणांमुळे स्थगित झालेल्या नगरपालिका–नगरपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान

Local Body Elections : न्यायालयीन प्रकरणांमुळे स्थगित झालेल्या नगरपालिका–नगरपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान

न्यायालयीन प्रकरणांमुळे यापूर्वी स्थगित ठेवण्यात आलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांसाठी आज पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

न्यायालयीन प्रकरणांमुळे यापूर्वी स्थगित ठेवण्यात आलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांसाठी आज पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यातील १६ जिल्ह्यांतील २४ नगरपालिका व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी तसेच ७६ नगरपालिका व नगरपंचायतींमधील एकूण १५४ सदस्यपदांच्या जागांसाठी आज मतदान होणार आहे.

या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी अध्यक्ष व सदस्यपदांसाठी तर काही ठिकाणी केवळ सदस्यपदांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या ताकदीने प्रचार केला आहे.

मतदानाची वेळ आज सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून आपला हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कडेकोट सुरक्षा व्यवस्था मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी संबंधित जिल्ह्यांमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज आहे.

मतमोजणी कधी?

सर्व नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. या निकालांकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवरील सत्ता कुणाच्या हाती जाणार, याचा फैसला आजच्या मतदानातून होणार असून, आजचा दिवस अनेक राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेचा मानला जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com