ताज्या बातम्या
Happy Shardiya Navratri 2025 : "दुर्गे दुर्घट भारी...." नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा पाठवायच्या आहेत? तर वाचा आणि लगेच पाठवा
नवरात्री शुभेच्छा: देवीच्या कृपेने सुख-समृद्धी आणि आरोग्य लाभो.
"नारी तू नारायणी, नारी तू सबला
तुझ्या तेजाने उजळे सृष्टी,
नमितो आम्ही तुजला
सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा"
"शक्ती अंगी येते आई तुझे नाव घेता
चैतन्य अंगी येते तुझे रूप पाहता
संकटे सगळे मिटून जातात तुझे स्मरण होता
सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा"
महाकाली तुमचे रक्षण करो महालक्ष्मी तुम्हाला सुख-संपत्ती देवो महासरस्वती तुमच्या मुखी वसो, सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा"
जय जय जय देवी जगदंबा तुळजा, एकवीरा तूच अंबा आदिशक्ती तू त्रिभुवनेश्वरी कीर्ती तुझी चराचरी
सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा
सोन पावलांनी आदिशक्ती तुमच्या घरी येवो,
सुख-संपत्तीसह तुम्हाला उदंड आरोग्य मिळो.
सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा"