ताज्या बातम्या
Waqf Amendment Bill : मोठी बातमी! लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर
अखेर लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे.
अखेर लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकसादर केलं. वक्फ सुधारणा विधेयक संसदेमध्ये सादर होताच विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला.
या विधेयकावर मध्यरात्री उशिरा लोकसभेत मतदान पार पडलं. विधेयकाच्या बाजूने 288 इतकी मतं पडली तर विधेयकाच्या विरोधात 232 इतकी मतं पडली आहेत. लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आता आज हे विधेयक राज्यसभेत सादर केलं जाणार आहे.
आज वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेत मांडले जाणार असून त्या ठिकाणी यावर चर्चा केली जाईल आणि नंतर मतदान प्रक्रिया पार पडेल. हे विधेयक राज्यसभेत मंजूर होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.