वर्ध्यात आजपासून 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात
Admin

वर्ध्यात आजपासून 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

वर्ध्यात आजपासून 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

वर्ध्यात आजपासून 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे. उद्घाटन आणि समारोपाला येणाऱ्या पाहुण्यांचं प्रत्यक्ष सूत कताई करणारा चरखा देऊन स्वागत केले जाणार आहे. विदर्भ साहित्‍य संघाच्‍या शताब्‍दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्‍य महामंडळाच्‍यावतीने वर्धा येथील राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी साहित्‍यनगरीमध्‍ये 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन होत आहे.

उद्घाटन आणि समारोप या दोन्ही कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री आणि संमेलनाचे मार्गदर्शक नितीन गडकरी, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे आदी जवळपास 19 प्रमुख पाहुणे राहणार आहेत.

संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर आहेत. उद्घाटन आणि समारोपीय कार्यक्रमाला येणार्‍या सर्व प्रमुख पाहुण्यांचा चरखा देऊन सत्कार करण्यात येणार आहे. परंतु, हा चरखा फक्त स्मृतिचिन्ह नसेल तर त्यावर सूत कताईही करता येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com