साहेब.... खचल्या बुजल्या विहिरीचे पंचनामे कधी; शेतकऱ्यांचा प्रश्न

साहेब.... खचल्या बुजल्या विहिरीचे पंचनामे कधी; शेतकऱ्यांचा प्रश्न

मनरेगा योजनेतून दुरुस्तीचे आदेश जिल्हाधिकारी यांनी अद्यापही काढलाच नाही.

भूपेश बारंगे, वर्धा

वर्ध्यात पावसाने अतिवृष्टीचा थैमान घातले होते.यात मोठे नुकसान झाले आहे. शेतातील विहिरी खचल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. खचल्या बुजल्या विहिरीचे अद्यापही पंचनामे करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांची ओरड सुरू आहे. मनरेगा योजनेतून खचल्या बुजल्या विहिरींना दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून आदेश काढून कृषी सहाय्यक व तलाठी पंचनामे केले जात.या योजनेतून शेतकऱ्यांना दीड लाखाची निधी मंजूर होत असल्याने यातून शेतकऱ्यांना विहीर दुरुस्तीसाठी मदत होते.मात्र जिल्हाधिकारी यांनी अद्यापही आदेश न काढल्याने शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार का असा प्रश्न शेतकरी करत आहे. वर्ध्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी पालकमंत्री सुनील केदार, आमदार दादाराव केचे, आमदार रणजित कांबळे, आमदार समीर कुणावार यांनी अतिवृष्टी भागाची पाहणी केली असून केंद्रीय पथकाने पाहणी केली आहे.यात विरोधी पक्ष नेते अजित पवार, माजी पालकमंत्री सुनील केदार यांनी खचल्या बुजल्या विहिरीचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांना करण्यात आली मात्र अद्यापही शेतातील विहिरीचे पंचनामे केले नाही. एकीकडे शेतातील पिक खरडून गेलं, पावसाच्या थैमानाने अनेकांना आपले संसार सोडून इतरत्र हलविण्यात आले होते.

अनेक कुटुंब स्थलांतर करण्यात आले होते, यात अनेक घराची पडझड झाली आहे.यामुळे शेतकरी नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.यात शेतातील विहिर खचल्या बुजल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे.यामुळे शेतकऱ्यांना मनरेगा योजनेतून विहिरीचे दुरुस्तीसाठी मंजूर करण्यासाठी काहीसा मोबदला देण्यात यावा यामुळे शेतकऱ्यांना थोडीफार मदत होईल.मनरेगा योजनेतून खचल्या बुजल्या विहिरींना दीड लाखाची मदत केली जाते मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणात विहीर खचल्याने हा निधी वाढवून दोन लाखाचा द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहे.

1जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत काढला जातो आदेश

अतिवृष्टीमुळे शेतातील खचल्या बुजलेल्या विहिरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून आदेश काढून विहिरीचे पंचनामे करण्यात येते,मात्र अद्यापही आदेश न काढल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीचे पंचनामे करण्यात आले नसल्याचे बोलले जात आहे.यावरून शेतकऱ्यांच्या विहिरीचे पंचनामे करण्यासाठी तत्काळ आदेश काढून विहीरिचे पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे.

दोन हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचा शेतकऱ्यांना यात समाविष्ट करावा

विदर्भातील शेतकऱ्याकडे दोन हेक्टर पेक्षा जास्त जमीन आहे.त्यामुळे त्या जमिनीतील विहीर खचलेल्या आहे.यावर्षी जवळपास सहा ते सात वेळा अतिवृष्टी झाली.नादिनाल्याला आलेल्या पुरामूळे विहीर खचला त्यामुळे दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या यात समाविष्ट करावा अशी मागणी केली जात आहे.

राज्याचे कृषीमंत्री आज वर्ध्यात येत असल्याने जिल्हाधिकारी यांना आदेश देणार का?

महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे आज जिल्ह्यातील अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी पहिल्यांदाच येत आहे. कोटांबा, सेलसुरा या भागाची पाहणी करणार असून शेतातील नुकसानीची पाहणी केली जाणार आहे.यात शेतपिकांचे झालेल्या नुकसानीला शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार हा प्रश्न असला तरी शेतातील विहिरी खचल्या बुजल्याचे आदेश काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांना आदेश देणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

माझ्या शेतातील पूर्णतः विहीर खचली

माझेकडे 83 आर शेतजमीन आहे त्यात विहीर असून ती यावर्षीच्या पावसामुळे पूर्णतः खचली यात विद्युत मोटरपपं विहिरीत पडले विहिरीचे मोठे नुकसान झाले असून याबाबत तहसील कार्यालयात अर्ज सादर केला मात्र अद्यापही कोणीही विहिरीचा पंचनामा करण्यासाठी आला नाही.आदेश दिले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Lokshahi
www.lokshahi.com