बातम्या
Unseasonal Rain : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा
राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पिकांचे नुकसान झाले होते.
आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज मराठवाड्यातही अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उन्हाळी पिकासह फळ भागांना देखील या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.