ताज्या बातम्या
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईच्या धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर
मुंबईच्या धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर आल्याने मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईच्या धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर आल्याने मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उष्मा वाढू लागल्याने पाणीसाठा पुढील तीन ते चार महिने पुरवावा लागणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा हा निम्म्यावर आला असल्याची माहिती मिळत आहे. हा पाणीसाठी पुढील तीन ते चार महिने पुरवावा लागणार असल्याची माहिती मिळत आहे.
कोणत्या धरणात किती पाणीसाठा?
भातसा 51.78 टक्के
तानसा 43.35टक्के
मोडकसागर 19.91 टक्के
उर्ध्व वैतरणा 70.67 टक्के
तुळशी 56.12 टक्के
विहार 59.03 टक्के
मध्य वैतरणा 50.98 टक्के