Pune Water Supply
ताज्या बातम्या
Pune Water Supply : पुणेकरांनो पाणी जपून वापरा; 8 ते 10 दिवस 'या' भागात पाणीपुरवठा विस्कळीत होणार
पुण्यात 8 ते 10 दिवस दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune Water Supply) पुण्यात 8 ते 10 दिवस दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. पुणे महानगरपालिकेच्या चिखली जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणात गळती झाली.
यामुळे पाईपलाईनच्या दुरूस्तीच्या कामाला वेळ लागणार असून यामुळे पुढील आठ ते दहा दिवस शहराच्या अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुणे महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर पाइपलाइन दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
पुणेकरांनो पाणी जपून वापरा
8 ते 10 दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार
दुरुस्तीच्या कामाला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागणार
