Manoj Jarange : 'अजितदादासारखा नेता पुन्हा होणे कठीण ' मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया

Manoj Jarange : 'अजितदादासारखा नेता पुन्हा होणे कठीण ' मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या राजकारणातील नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने राज्यभर हळहळ पसरली आहे. बारामतीजवळील विमान अपघातात पाच सहकाऱ्यांसह अजित पवारांचा मृत्यू झाला.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

महाराष्ट्राच्या राजकारणातील नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने राज्यभर हळहळ पसरली आहे. बारामतीजवळील विमान अपघातात पाच सहकाऱ्यांसह अजित पवारांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने राज्यातील राजकीय वर्तुळावर प्रचंड धक्का बसला आहे.या घटनेनंतर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले, “अजित दादा गेल्याने राज्याला खूप मोठ नुकसान झाले आहे. ही पोकळी आता कधीही भरून निघणार नाही. अजितदादासारखा नेता पुन्हा येणे कठीण आहे. त्यांच्या जाण्याने राज्यावर मोठे संकट आले आहे.”

मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांचे व्यक्तिमत्वही स्मरले. ते म्हणाले, “अजितदादा हा नेहमीच कार्यकर्त्यांसाठी हवा हवाईसा वाटणारा नेता होता. त्यांची काम करण्याची पद्धत, स्पष्ट वक्तृत्व आणि प्रशासनावर पकड ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वेगळी ओळख होती. त्यांनी नेहमीच जनतेसाठी आणि राज्यासाठी कठोर मेहनत केली.” त्यांनी पुढे सांगितले, “अजितदादा हे राजकारणातील अनुभवसंपन्न नेता होते. त्यांनी अनेक वर्षे राज्याच्या प्रशासन आणि विकासकामामध्ये मोठा वाटा उचलला. त्यांचे जाणे केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा अभाव भविष्यात राजकारणातील निर्णय प्रक्रियेत जाणवेल.”

मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, अजित पवार यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात एक मोठा धक्का बसला असून, त्यांच्या योगदानाची रिकामी जागा भरून काढणे सोपे नाही. ते म्हणाले, “अजितदादा गेल्यामुळे महाराष्ट्राला खूप मोठा नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाने राज्यात शोककळा पसरली आहे, आणि त्यांच्या स्मरणासाठी महाराष्ट्राचे सर्व नागरिक व कार्यकर्ते सदैव त्यांना आदराने आठवतील.” या प्रतिक्रियेतून स्पष्ट होते की, अजित पवार यांचा महाराष्ट्रातील राजकारणातला ठसा कायम राहणार आहे आणि त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली रिकामी जागा भरून काढणे कठीण आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com