Manoj Jarange On Chhagan Bhujbal : "कधी गेम करतील कळणार नाही" ; छगन भुजबळांच्या 'त्या' वक्तव्यावर जरांगेचं प्रत्युत्तर
राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करण्याच निर्णय घेतल्यानंतर राज्यात मराठा आणि ओबीसी (OBC Reservation) संघर्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात ओबीसी समाजाने बीडमध्ये एल्गार पुकारलायं. आज बीडमध्ये महा एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे, या मेळाव्यात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटीलांचा दरिंदि म्हणून उल्लेख केला आहे. यापार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी ते म्हणाले की, "छगन भुजबळाच राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी बीडमध्ये मेळावा घेतला आहे. बीड जिल्ह्यावर दहशत निर्माण करण्यासाठी सभा घेतली असून भुजबळ बीड जिल्ह्यातलं वातावरण खराब करत आहेत. त्यांच्या बाजूचा रक्ताने हात भरलेला धनंजय मुंडे सुद्धा म्हणाला होता, बघा क्लिपा काढून, हे फक्त राजकीय स्वार्थासाठी त्याचा वापर करत आहेत. परंतू तो चुकीच्या दिशेने चालत असल्याचे लक्षात ठेवावे. धनंजय मुंडेंला बळीची बकरी बनवण्याचे भुजबळांचे धोरण आहे. कारण सभेत 75 टक्के पेक्षा जास्त लोक धनंजय मुंडेचं होती. त्यामुळे भुजबळाला माहिती आहे की, याला हाताखाली सध्या तरी पण धनंजय मुंडेचं माहिती नाही, की भुजबळ याचा कधी गेम करुन निघून जाईल याचा काय नेम नाही. राजकीय करिअरचं धनजंय मुंडेनी पाहावं, त्यांच्या नादी लागून कुटाना करु नये."