मुंबईवर 26/11 पेक्षाही मोठा हल्ला करू; मुंबई पोलिसांना आले 26 मेसेज; विरारमधून घेतलं एकाला ताब्यात

मुंबईवर 26/11 पेक्षाही मोठा हल्ला करू; मुंबई पोलिसांना आले 26 मेसेज; विरारमधून घेतलं एकाला ताब्यात

सणासुदीच्या काळात मुंबईवर दहशवादाचे सावट निर्माण झाले आहे. मुंबईत 26/11 सारखा हल्ला करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रुमला हा धमकीचा मेसेज आला आहे. राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सणासुदीच्या काळात मुंबईवर दहशवादाचे सावट निर्माण झाले आहे. मुंबईत 26/11 सारखा हल्ला करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रुमला हा धमकीचा मेसेज आला आहे. राज्यात एकच खळबळ उडाली आहे.मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रुमला धमकीचा मेसेज आला असून २६/११ सारखा घातक हल्ला करणार असल्याची धमकी दिली आहे. कंट्रोल रुमच्या व्हॉट्स अॅप नंबरवर पाकिस्तानमधून धमकी वजा मेसेज आला आहे. याशिवाय या हल्यात भारतात असलेल्या ६ जणांची मदत घेणार असल्याची माहितीही स्पष्ट केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला असून राज्यभरात हायअलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, काहीच दिवसांपुर्वी हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळून आली होती. या बोटीची तपासणी केली असता यामध्ये AK 47 बंदुका आढळून आल्या होत्या. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले होते. परंतु, आता मुंबई कंट्रोल रुमला धमकीचा मेसेज आल्याने पुन्हा एकदा पोलिसांनी मुंबईत बंदोबस्त वाढवला असून खबरदारी घेतली जात आहे.

याचपार्श्वभूमीवर विरारच्या भाटपाडामधू मोहम्मद असेच या 22 वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची कसून चौकशी सुरू करण्यात आली असून हा मेसेज कुठून आणि कसा आला त्याचीही इतर यंत्रणामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.धमकीच्या मेसेज बरोबर हिंदुस्थानातील सहा जणांचे नंबरदेखील पाठवण्यात आले आहेत. माझे लोकेशन इकडेच दाखवले पण काम मुंबईत चालेल असा मेसेजही पाठवण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक विभागाकडून लगेच याबाबत मुंबई पोलीस एटीएसच्या मुख्य नियंत्रण कक्षाला सांगण्यात आल्यानंतर धमकीच्या संदेशावरून अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय दंड विधान कलम 506/2 अन्वेय वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईत महत्वाच्या ठिकाणी प्रचंड मोठी सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. मोबाईल नंबर पाकिस्तानच्या लाहोर येथील मोहम्मद इम्तियाज नावाच्या व्यक्तीचा असल्याचे समजले आहे. मोहम्मद हा येथील शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याकडे कामाला आहे त्याचा मोबाईल चोरीला तर गेलाच आहे, पण तो अँड्रॉइड फोन नाही त्यामुळे त्या नंबर वरून व्हाट्सअप मेसेज आलाच कसा असंही त्याचे म्हणणे आहे.

या दहशतवादी मेसेजेसची आणि गंभीरपणे दखल घेण्यात आली असून मुंबईकरांनी काळजी करू नये निर्धास्त राहावे असे सांगण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले आहे ज्या नंबर वरून हे मेसेज आले तो नंबर पाकिस्तानचा कोड असल्याचे फणसाळकर यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com