ताज्या बातम्या
Devendra Fadnavis On Operation Sindoor : "पापांची हंडी फोडणार....", ऑपरेशन सिंदुरवर फडणवीसांचे भाष्य
दहीहंडीच्या उत्सवात फडणवीसांचा संदेश: 'भारताची ताकद जगाने पाहिली'
आज राज्यात दहीहंडीचा सण मोठा उत्साह साजरा होतं आहे. ठिकठिकाणी गोविंदा हंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. घाटकोपरचे आमदार राम कदम यांच्या मानण्याच्या हंडीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूर भाष्य केले.
त्यावेळी ते म्हणाले की, "ही हंडी ऑपरेशन सिंदुरला समर्पित करणारी आहे. ऑपरेशन सिंदुर हे पाकिस्तानच्या पापांची हंडी फोडणारं आहे. आमच्या वीर सैनिकांनी ज्या प्रकारे पाकिस्तानमध्ये घुसून आतंवाद्यांचे अड्डे नाहिसे केले. संपूर्ण जगाने ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताची ताकद पाहिली आहे. नरेंद्र मोदीं सांगतात, पाकिस्तान के इरादोको मट्टी पलित कर दूंगा. त्यावेळेस कशाप्रकारे पाकिस्तानला मातीमोल करण्याचं प्रधानमंत्र्यांनी केलं."