Ram Kadam On Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर हाताचे ठसे घेतले? मृत्यूपत्र कोणी केले? बॉडी 2 दिवस का काढली नाही? रामदास कदमांचे प्रश्न अन् उद्धव ठाकरेंवर घोर आरोप
आज राज्यात अनेक पक्षांचे दसरा मेळावे पार पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर दसऱ्याला शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. आज शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा दसरा मेळावा नेस्को येथे पार पडत आहे. रामदास कदम यांनी आपल्या भाषणात खुल आव्हान केलं.
ते म्हणाले की, इकडे कोण तिकडे कोण यांचा प्रश्न माध्यामांना पडत असतो. महाराष्ट्रामध्ये पुर आहे त्यामुळे मला पुष्पगुच्छ नको असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची हवस होती. त्यामुळे तुम्ही कॉंग्रेसजवळ केलात. सोनिया गांधीच्या पायावर शिवसेना घाण ठेवली. आनंदाचा मेळावा नसून पुरग्रस्तांचा मेळावा आहे. तिथे समजलेला सगळे मावळे आहेत, तिथे सगळे टोमकावळे आहेत. 30 वर्ष महापलिका तुमच्या हातात होती. तुम्ही राज ठाकरेंच्या मागे भीक मागत फिरत आहे मला जवळ घ्या जवळ घ्या म्हणून. शिवसेना प्रमुखाचे निधन कधी झाले किती दिवस बॉडी घरात होती. दोन दिवस बॉडी घरात काय करत होती. सगळ्यांची माहिती काढा. शिवसेना शिंदे नेते रामदास कदम यांनी म्हटले आहे.