Darjeeling
Darjeeling

Darjeeling : दार्जिलिंगमध्ये मोठी दुर्घटना; पूल तुटून 6 लोकांचा मृत्यू

दुधिया लोहा पूल तुटून 6 लोकांचा मृत्यू
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • दार्जिलिंगमध्ये पूल तुटून 6 लोकांचा मृत्यू

  • पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली

  • दुधिया लोहा पूल तुटून 6 लोकांचा मृत्यू

(Darjeeling) पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये पूल तुटून 6 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत असून भूस्खलन झाले आहे. यामध्ये मिरिक परिसरातील दुधिया लोखंडी पुल तुटला.

या घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.अनेक भागात पाणी साचल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम बंगालच्या डोंगराळ भागात सततच्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

अनेक ठिकाणी पूरामुळे बचाव पथकाला अडचणींचा सामना करावा लागत असून या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनासह बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरु असून ढिगारा हटवण्याचे आणि रस्ते पूर्ववत करण्याचे काम सुरु आहे.

हा पूल मिरिक आणि बाजूच्या परिसरातील सिलिगुडी कुर्सियांग परिसराला जोडतो. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पोलीस देखील या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com