प्रवाशांनी भरलेली बस उलटली, ४५ जण जखमी, एकाचा मृत्यू

प्रवाशांनी भरलेली बस उलटली, ४५ जण जखमी, एकाचा मृत्यू

पश्चिम बंगालमधील पूर्व बर्धमान जिल्ह्यात रविवारी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

पश्चिम बंगालमधील पूर्व बर्धमान जिल्ह्यात रविवारी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू तर ४५ जण जखमी झाले आहेत. भरघाव वेगाने येणारी बस अचानक उलटली आणि अपघात झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या अपघाताचा व्हिडिओ चांगलात व्हायरल होत आहे. “या अपघातात ४५ जण जखमी झाले आहेत. चालकाला अटक करण्यात आली असून, बस ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस रोडवरती चालण्यासाठी पात्र होती का? याचा तपास पोलीस करत आहेत,” असे पूर्व बर्धमान जिल्ह्याची अतिरिक्त पोलीस आयुक्त ध्रुबो दास यांनी सांगितले.

तसेच या अपघातात तीन जणांचा प्रकृती गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर कटवा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, काहींवर उपचार करुन घरी पाठवण्यात आलं आहे. मृताची ओळख पटल्यानंतर शवविच्छेदन करण्यात येणार आहे. असे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समजते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com