Special Report : प.विदर्भाला सावत्र वागणूक? मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान, विदर्भातील शेतकरी संतप्त
मराठवाड्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सारेच मंत्री गेले. मात्र पश्चिम विदर्भातही लाखो हेक्टरवरील शेती अक्षरश: खरडून निघाली आहे. नेते मंडळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी न आल्यानं, पश्चिम विदर्भाला सावत्र वागणूक का? असा सवाल आता शेतऱ्यांमधून उपस्थित केला जातोय. पाहुयात सविस्तर.
पश्चिम विदर्भातही मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान
नेते मंडळी न आल्यानं विदर्भातील शेतकरी संतप्त
पश्चिम विदर्भाला सावत्र वागणूक मिळत असल्याची शेतकऱ्यांची भावना
यवतमाळ जिल्ह्यातील 107पेक्षा जास्त महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्यानं 4 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे... पीक खरडून गेल्यानं शेतात मातीशिवाय काहीच शिल्लक नाही... त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय... मराठवाड्यात जाऊन मंत्र्यांनी नुकसानीची पाहणी केली मात्र पश्चिम विदर्भात मंत्री न आल्यानं, शेतकरी संतप्त झाले आहेत.... आता मुख्यमंत्री 28 सप्टेंबरला यवतमाळच्या दौऱ्यावर जाणार आहेत, त्यावेळी आम्ही त्यांना नुकसान भरपाईबाबत जाब विचारू, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिलीय.
शेतकरी पुत्र कुणाल जतकर यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ( मराठवाड्यात मंत्री गेले, मात्र पश्चिम विदर्भात नाही... मुख्यमंत्री साहेब 28 तारखेला यवतमाळ येथे येणार आहे तेव्हा आम्ही दाखवून देऊ की शेतकऱ्यांची काय एकजूट आहे)
HEADER - पश्चिम विदर्भातही मोठं नुकसान
SUB - 1 जून ते 18 सप्टेंबरपर्यंत
8 लाख 38 हजार 729 हेक्टरवरील पिकं बाधीत
बुलढाण्यात सर्वाधिक 3 लाख 3 हजार 768 हेक्टरवर नुकसान
यवतमाळ जिल्ह्यात 3 लाख 653 हेक्टरवरील पिकांना फटका
वाशिम जिल्ह्यात 1 लाख 74 हजार 447 हेक्टरवर नुकसान
अमरावती जिल्ह्यात 1 लाख 23 हजार हेक्टरवर नुकसान
अकोला जिल्ह्यात 3 हजार 790 हेक्टरवरील पिकं बाधीत
इतक्या मोठ्या प्रमाणावर पश्चिम विदर्भात नुकसान झालं असताना, फक्त 565 कोटीची मदत जाहीर केली... हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आल्याचा प्रकार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.. नुकसान लाखात आणि मदत हजारात, हा कुठला न्याय? असा सवालही शेतकऱ्यांमधून उपस्थित होतोय.
दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात 4 लाख 90हजार हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. शेतकऱ्यांची पीक उत्पादन वाढ व्हावी यासाठी कृषी विभागही दक्ष झालाय.... बांधावर जाऊन अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
आता 28 सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यवतमाळचा दौरा करणार आहेत... त्यामुळे आपल्या या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री हे पश्चिम विदर्भासाठी काही घोषणा करून, शेतकऱ्यांची नाराजी दूर करणार का? याकडे लक्ष लागलंय...