धनंजय मुंडे यांना झालेला बेल्स पाल्सी हा आजार नेमका काय? आजाराची लक्षणं नेमकी काय?
धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी या आजाराची लागण झाली आहे. या आजारामुळे त्यांना सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नाही. याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करत दिली. सध्या त्यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आता चर्चा सुरु आहे ती म्हणजे हा आजार नेमका काय आहे? कशामुळे होतो आणि त्याची लक्षणे कोणती आहे?
या आजारात चेहऱ्याचे स्नायू कमकुवत होतात. चेहऱ्याच्या एका बाजूला तात्पुरता लकवा सदृश्य स्थिती निर्माण होते. एक डोळा बंद करण्यासाठी अडचणी येऊ शकतात. बेल्स पाल्सी हा फक्त प्रौढ व्यक्तींना किंवा मधुमेह असलेल्या व्यक्तींना होतो. वेळेवर आणि योग्य उपचार केल्यास हा आजार बरा होऊ शकतो.
बेल्स पाल्सीची कारणे:
जेवणात मीठाचा जास्त प्रमाणात वापर केल्यामुळेही हा आजार उद्भवू शकतो, मधुमेह किंवा इतर काही आरोग्य समस्या असल्यास, अचानक थंडी लागणे किंवा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, जास्त तणाव किंवा मानसिक दडपण
बेल्स पाल्सीची लक्षणे:
डोळे आणि तोंड व्यवस्थित बंद न करता येणे
चेहऱ्यावर मुंग्या येणे किंवा सुन्न वाटणे
चेहऱ्याच्या एका बाजूला कमजोरी किंवा लकवा सारखे वाटणे
खाताना, हसताना, बोलताना त्रास होणे
कानाजवळ वेदना होणे