Stop Eating Salt : मीठ टाळल्याने महिनाभरात शरीरात काय बदल दिसतील? जाणून घ्या..
आजकाल फिटनेसच्या नादात अनेक जण अति टोकाचे प्रयोग करत आहेत. असाच एक प्रयोग म्हणजे पूर्णपणे मीठ बंद करणे. पण तज्ज्ञ सांगतात की महिनाभर अजिबात मीठ न खाल्ल्यास शरीरासाठी ते धोकादायक ठरू शकते.
मीठात असलेले सोडियम शरीरासाठी अत्यावश्यक आहे. ते पाणी संतुलन, स्नायूंची हालचाल आणि मेंदूचे कार्य सुरळीत ठेवते. दीर्घकाळ मीठ न घेतल्यास थकवा, चक्कर, कमी रक्तदाब, स्नायूंना पेटके आणि गोंधळलेली अवस्था अशी लक्षणे दिसू शकतात. काही प्रकरणांत ही स्थिती गंभीरही होऊ शकते.
एका तरुणीने वजन आणि बीपी नियंत्रणासाठी महिनाभर मीठ टाळले. सुरुवातीला सगळं ठीक वाटलं, पण नंतर प्रकृती बिघडली आणि डॉक्टरांकडे जावे लागले. तेव्हा लक्षात आले की मीठ पूर्णपणे बंद करणे चुकीचे आहे.
डॉक्टरांचा सल्ला स्पष्ट आहे. मीठ जास्त खाणे वाईट, पण अजिबात न खाणेही तितकेच धोकादायक. योग्य प्रमाणात मीठ आहारात असले पाहिजे. कोणताही मोठा बदल करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणेच शहाणपणाचे आहे.

