BMC Elections: मुंबई मनपाचा गड राखण्यासाठी ठाकरेंनी काय आखली रणनीती?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालं. मात्र, महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण गेल्या टर्ममध्ये सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला आता आपल्या अस्तित्वासाठी अधिक प्रखरपणे लढावं लागण्याचं चित्र तयार झालं आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना फुटीनंतर विधानसभा निवडणूक ही लिटमस चाचणी होती. मात्र, त्यामध्ये महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना कमी मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. राज्यातील शिवसैनिकांनी पक्ष मोठा केला. त्यानंतर २०१९ साली उद्धव ठाकरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेससोबत हातमिळवणी करून सरकार स्थापन केलं. आणि मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. त्यानंतर मध्यांतरीतच एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेना पक्षावरच आपला दावा सांगितला. भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन केलं. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे यांना अवघ्या २० जागांमध्ये समाधान मानावं लागलं. शिवसेनेमध्ये इतक्या घडामोडी घडल्यानंतर ठाकरे समोर आता पुढील काळ महत्त्वाचा आहे. मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आणणं हे ठाकरेंसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे यांनी काय आखली रणनीती?
विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेच्या तयारीला लागले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय आढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत. गेल्या 25 वर्षांपासून मुंबई पालिकेवर शिवसेनेची एकहाती होती. मात्र आता शिवसेनेच्या फुटीनंतर आणि विधानसभा निवडणुकीतील अनपेक्षित निकालामुळं ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबई महापालिका मिशन यावर लक्ष केंद्रित केलं आहे. याचाच एक भाग म्हणून आजपासून प्रभाग निहाय आणि राज्यातील विधानसभानिहाय बैठकीतून आढावा घेतला जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्या हातून मुंबई महापालिका जाऊ द्यायची नाही, या इराद्याने ठाकरेंची शिवसेना जोरदार तयारी करीत आहे. या बैठकीत ठाकरे गटाकडून वेगवेगळी रणनीती आखली जाण्याची शक्यता असून, बैठकीतून उद्धव ठाकरे हे नेत्यांना यशाचा कोणता कानमंत्र देणार आहेत? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
दरम्यान, मातोश्रीवर गेल्या तासाभरापासून उद्धव ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक सुरु आहे. विनायक राऊत तसेच बोरिवली, मागाठाणे, दहिसर येथील शाखाप्रमुख आणि पदाधिकारी देखील मातोश्रीवर उपस्थित आहेत. या बैठकीत महानगरपालिकेच्या तयारीचा आढावा तसेच जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या शाखा भेटीचे आयोजन करण्यासंदर्भात देखील चर्चा करण्याची शक्यता आहे.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-