शरद पवारांसोबतच्या बैठकीत काय झाली चर्चा? बाळासाहेब थोरात म्हणाले...

शरद पवारांसोबतच्या बैठकीत काय झाली चर्चा? बाळासाहेब थोरात म्हणाले...

आज काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
Published by :
Siddhi Naringrekar

आज काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोकसभेची निवडणूक आज जाहीर होत आहे. आम्ही सर्वजण पवार साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो. लोकसभेची निवडणूक म्हटल्यावर अनेक गोष्टींवर चर्चा झाली.

आज राहुलजींची न्याय यात्रा आहे. उद्या आमच्या इंडियाची रॅली आहे. पवार साहेबांना याचे निमंत्रण दिलं. लोकसभेच्या निवडणुकीत प्रचाराच्या बाबतीत काय काय केलं पाहिजे त्यावर देखील आमची चर्चा झाली आहे. पवारांसोबत जागावाटपाबाबत चर्चा झाली.

उद्याची मोठी सभा महत्वाची आहे. ती अत्यंत यशस्वी व्हावी यासाठी काय काय केलं पाहिजे याची चर्चा आम्ही केलेली आहे. निवडणुकीचा राज्यभर कसा प्रचार करायचा याबाबत चर्चा केली. जागावाटपाबाबत मविआमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com