यावर्षी देशात मान्सूनची स्थिती काय राहणार? आज भारतीय हवामान विभागाची पत्रकार परिषद
Admin

यावर्षी देशात मान्सूनची स्थिती काय राहणार? आज भारतीय हवामान विभागाची पत्रकार परिषद

राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले.

याच पार्श्वभूमीवर आज भारतीय हवामान विभागाची पत्रकार परिषद होणार आहे. यंदा देशातील पावसाच्या स्थितीबाबत भारतीय हवामान विभाग नेमकी काय माहिती देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावर्षी देशात मान्सूनची स्थिती काय राहणार आहे. याची माहिती आज भारतीय हवामान विभागाच्या पत्रकार परिषदेमधून सांगण्यात येणार आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि आयएमडीचे महासंचालक डॉ. महापात्रा यांच्या उपस्थिती ही पत्रकार परिषद होणार आहे. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेकडून मान्सूनचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून देखील जून ते सप्टेंबर दरम्यानचा सरासरी पाऊसमानाचा अंदाज जारी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. आज भारतीय हवामान विभागाकडून देखील जून ते सप्टेंबर दरम्यानचा सरासरी पाऊसमानाचा अंदाज जारी करण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com