Raj Thackeray Melava : राज ठाकरे काय बोलणार?, अचूक मुद्दे मांडा लोकशाही मराठीकडून जिंका रोख रक्कम...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उद्या सकाळी दहा वाजता गोरेगाव (पूर्व) येथील नेस्को सेंटरमध्ये मतदारयादी प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांच्या लोकशाही मराठी घेऊन आले आहे की, राज ठाकरे कोणते मुद्दे मांडणार यांचे पाहिल्या 100 कमेंट्सला लोकशाही मराठीकडून 500 रुपये देण्यात येणार आहे. तुम्ही तुमच्या कमेंट नक्की पाठवा.
राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे, पण सध्या मतदारयादीतील घोळाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विरोधी पक्षाच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन मतदारयादीतील त्रुटींवर बोट ठेवले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना मतदारयादीतील घोळावरून प्रश्न विचारले होते. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षासाठी काम करीत असल्याची टीका केली होती. मागील पाच वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत.